HARI OM

HARI OM

Thursday, April 7, 2011

श्री हरीगुरुग्राम प्रवचन दिनांक - ०३-०३-२०११ हरी ओम !!!!

श्री हरीगुरुग्राम प्रवचन दिनांक - ०३-०३-२०११


हरी ओम !!!!

मागील प्रवचनात बापू आपल्या मोठ्या आईच्या "क्षमा " या नावावर बोलत होते.

या वेळी पण बापू त्यावरच बोलत होते..... बापू म्हणाले मी या नामावर जेवढे बोलेन नां तेवढे कमीच आहे अगदी युगानुयुगे मी यावर बोलत राहीन..... तरीही संपणार नाही माझ्या आईची महती....



बापू नि १ उदाहरण दिले ... समजा 'X' नावाची १ स्त्री आहे ती आपल्या वडिलांसाठी मुलगी आहे, पतीसाठी प्रेयसी आहे, मुलांसाठी माता आहे, सासुसाठी सून आहे, नणंदेसाठी वहिनी आहे,वहिनी साठी नणंद आहे ... अशी खूप काही नाती सांगितली बापूनी .....

त्याचप्रमाणे "सत्ता" हि सुद्धा स्त्रीलिंगी आहे, बापूनी इतर कोणती सत्ता नव्हे तर फक्त वैश्विक सत्तेबद्दल सांगितले, कि जी सत्ता विश्वावर नियंत्रण ठेवते ती वैश्विक सत्ता आणि ती सत्ता म्हणजेच आपली - "आदिमाता'......

बापूनी यावेळी तीन मार्गांचा उल्लेख केला

१. वैदिकमार्ग

२.भक्तीमार्ग

३.तंत्रमार्ग

यापैकी वैदिकमार्ग आणि भक्तिमार्ग एकमेकांना जवळचे आहेत. वैदिकमार्गातून भक्तिमार्ग मिळतो.

तर तंत्रमार्ग म्हणजेच वैदिकमार्गातील तंत्रांचा - गणितांचा रुक्ष उपयोग करून तयार झालेला मार्ग, बापू सांगतात कि साध्या माणसाची गणिते नेहमी चुकतात....

तंत्र मार्गात आदिमातेला आदिमाता न मानता आदिसत्ता मानतात आणि त्याच सत्तेचे रुक्ष असे गणित मांडले जाते.....

वैदिक मार्ग, भक्तिमार्ग आणि तंत्रमार्ग यांचे सविस्तर वर्णन करताना बाप्पाने हिमालय पर्वत, त्यातून निघणारी गंगा (TRIPATHGAMINI) आणि बर्फाची factory याचे उदाहरण दिले.

बापू सांगतात वैदिक मार्ग म्हणजे - हिमालय, भक्तिमार्ग म्हणजे त्यातून निघणारी गंगा जी सर्व पाप नाहीसे करून पवित्र करते, तर बर्फ तयार होणारी factory म्हणजेच तंत्रमार्ग .....

हिमालयात जेवढा बर्फ आहे तेवढा बर्फाच्या फाक्टरी मध्ये तयार होऊ शकतो पण त्यातून ती पावन गंगा कधीच वाही शकत नाही......



बापू सांगतात हि जी महाविष्णूच्या चरणकमळातून निघणारी गंगा आहे ती आदिमातेच्या क्षमेचा १ अंश इतकी आहे.

(यावरूनच विचार करा कि आदिमातेकडे किती क्षमा असेल?)

तर अंश म्हणजे नेमके काय?

e.g. पृथ्वीवर जेवढे काही समुद्र, नद्या वगेरे आहेत ते म्हणजे संपूर्ण जल तत्वाचा १ अंश इतके आहे म्हणजेच 'अंश' म्हणजे १ परिमाण.

आणि जलतत्त्व म्हणजेच 'अंशी' आहे.

यावरूनच कळते कि जर ती गंगा माता आपल्या मोठ्या आईचा १ अंश (क्षमा) असेल तर आपल्या आदिमातेकडे किती क्षमा आहे.

बापू सांगतात हे अंश आणि अंशी यामधील फरक एका आदिवासी भजनामध्ये अगदी सरळ आणि सोप्या भाषेत मांडला आहे...

"सूर्य जो सर्वाना प्रकाश देतो आणि जेवढे काही प्रकाशीत करतो अगदी शेवटच्या टोकापर्यंत तेवढे म्हणजे 'भगवंत' आणि जेवढे सूर्यकिरण आपल्या डोळ्यात जातात तेवढे म्हणजे 'मानव' या वरूनच समजते कि मानव म्हणजेच 'अंश' (भगवंताचा) आणि भगवंत म्हणजे 'अंशी' (मानवाचा)..."



तर आपल्या आदिमातेचे खरे नाव "क्षमा" हेच आहे बाकी सर्व नावे या नावाचा "अंश" आहेत.



स्त्रीकडे क्षमेची खूप मोठी ताकद असते कारण आदिमातेने 'क्षमा' स्वरूप धारण केले आहे.



"तिच्या एवढी क्षमा कोणाकडेही नाही....."



बापू सांगतात पती आणि पत्नी यामध्ये पत्नी शिवाय कोणतेच मंगल कार्य पूर्ण होत नाही. पती जेव्हा १०० ग्राम पुण्य करतो त्यावेळी त्यातले ५० ग्राम पतीचे कमी न होता पत्नीला मिळत असते. जर त्या दोघांचे एकमेकांवर खूप प्रेम असेल तर ५० ग्राम पेक्षाही जास्तच मिळते.



"प्रत्येक पत्नीसाठी आपला पती हा देव असलाच पाहिजे आणि असतोच ..."



आणि पतीनेसुद्धा देवासारखे वागलेच पाहिजे, प्रत्येक पतीला आपल्या पतीचा आधार बनता आलेच पाहिजे,

कारण जेव्हा पतीचा आधार असतो तेव्हा पत्नी अगदी काठीनातला कठीण प्रसंगातून सुद्धा तरुण नेते.. कारण तिच्याकडे क्षमा असते.



पृथ्वीकडे पण क्षमा असते ... तिचे नावच मुळी क्षमा आहे... आपण तिला लाथा मारतो, तिच्यात नांगर खुपसतो किती काही काही करतो

पण तरीही ती आपल्याला अन्न, जल देतच असते ती कधीच रागवत नाही....



ज्याप्रमाणे आदिमातेने 'क्षमा' हे रूप धारण केले आणि स्त्री मध्ये तेच क्षमा तत्व / गुणधर्म आले, त्याचप्रमाणे शिवाचा गुणधर्म म्हणजेच "आधार" हा पुरुषांमध्ये असतो. महाविष्णू हा नेहमी गती देत असतो तर शिव हा नेहमी आधार देत असतो.



आधाराशिवाय काही होऊ शकत नाही.



सर्वाना आधार देणे आणि व्यवस्थित ठेवणे हे काम गुरुतत्वाचे आहे.



स्त्रीने तिचे क्षमातत्व आणि पुरुषाने त्याचे आधारतत्व जोपासले पाहिजे. ज्यावेळी हे स्त्रीचे क्षमातत्व आणि पुरुषाचे आधारतत्व एकत्र येते त्यावेळी तो संसार अगदी सुखाचा होतो..

क्षमा हाच मोठा आधार आहे आणि खरा आधार क्षमाच देऊ शकते. म्हणूनच तर शिवाने अर्धनारीनटेश्वराचे रूप धारण केले.



स्त्री आणि पुरुष हे आदिमातेनेच निर्माण केले.



आद्य स्त्री आणि पुरुषजोडपे - म्हणजेच - महाशिव-पार्वती, महाब्रम्हा-सरस्वती आणि महाविष्णू - लक्ष्मी हे आदिमातेनेच तयार केले, त्यांच्यावर वैदिक संस्कारहि आदिमातेनेच घडवले, त्यातूनच प्रजोत्पत्ती झाली तेही आदिमातेच्याच प्रेरणेतून घडून आले.

एवढेच नव्हे तर त्या आदिमातेने मानवी रुपात अनसूया आणि अत्री हि दोन्हीही रूपे धारण करून आईने मानवी जीवनातील प्रत्येक संस्कार प्रत्येक व्यवहार करून दाखवला.

तर अशी हि आपली आई कि जीने आपल्याला सर्व काही शिकवले.

आणि तिच्याइतकी क्षमा कोणाकडेही नाही हे पाहण्यासाठी बापूनी सांगितले कि सद्गुरूच्या फोटोपुढे १० मिनिटे डोळे बंद करून बसा आणि आपण लहानपणापासून केलेल्या सर्व चुका आठवा. बापू म्हणाले १० मिनिटे पण तुम्ही बसू शकणार नाही....

आणि मगच तुम्हाला कळेल कि आपली हि आई आपल्याला किती क्षमा करते ते......



बापू म्हणतात मी कोण आहे? मला माझ्या आईने कशाला पाठवले आहे?



तिने बापूला पाठवले आहे ते फक्त तिची क्षमा आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी...

बापू म्हणतात पाहिजे तर मला माझ्या आईचा पोस्टमन म्हणा.....

मी क्षमा करत नाही ... माझा तो गुणधर्म नाही.... माझा गुणधर्म आहे तो आधार....

क्षमा फक्त माझी आईच करू शकते....

बापू म्हणतात "मी माझ्या आईची पोस्टाची पेटी , पोस्टाचे ऑफिस आहे..."

तिला जे तुमच्या पर्यंत पोहोचवायचे आहे ते ती त्यात टाकते आणि ते तुम्हाला माझ्याकडून मिळते म्हणन मी फक्त माझ्या आईची पोस्टाची पेटी आहे.



आईची क्षमा सांगताना बापूनी सत्ययुगातील १ गोष्ट सांगितली....

सत्ययुगाच्या शेवटच्या भागात वैखानर नावाचा १ ऋषी होता. त्याने परमशिवाची घनघोर तपश्चर्या केली आणि खूप ताकद मिळवली. त्याला वाटले आपण परमशिवा एवढे ताकदवान झालो तर त्या पेक्षा जास्त ताकद आदिमातेची आहे तर तिला मात देण्यासाठी व तिच्या एवढी ताकद मिळवण्यासाठी त्याने आदिमातेची घनघोर तपश्चर्या करायला सुरुवात केली. त्याची तपश्चर्या पूर्ण होण्या आधीच आई त्याच्या वर प्रसन्न झाली. त्याने आईकडे वर मागितला कि मला तुझ्या तुल्यबळ व्हायचे आहे. आईने सांगितले तुला अजून तपश्चर्या करावी लागेल त्याप्रमाणे त्याने केली, आई पुन्हा प्रकट झाली पुन्हा त्याने तेच मागितले, आईने त्याला समजावले कि तुला कळतंय का? कि तेव्हा काय होईल? तुला माझी जागा घ्यायची आहे का?

त्याने उत्तर दिले नाही... मला तुझ्याही पुढे जायचे आहे....

त्यावेळी आईने सांगितले मग अजून तपश्चर्या कर त्याने केली आई पुन्हा प्रकट झाली, पुन्हा तेच...

आईने त्याला १ दिवस आणि १ रात्री साठी आईने तिची सर्व ताकद दिली.

ती ताकद प्राप्त होताच आईएवढे पावित्र्य त्याला प्राप्त होते आणि तेव्हा तो सर्व जगाचा नाश करतो, हा वाईट तो वाईट , ती वाईट असे करत करत सर्व जगाचा तो नाश करती आणि सर्व जगाचा नाश आपण केला म्हणून तो स्वताचा नाश करायला जातो तोच ती करुणामयी पुन्हा प्रकट होते आणि म्हणते थांब बाला काय करतो आहेस?

हे जे काही झाले ते स्वप्न होते मूल असे काहीच झाले नाही....

हे सर्व का झाले तर तुझ्याकडे क्षमा नाही आधी क्षमा मिळव आणि नंतर ताकद मिळव कारण क्षमा मिळाली तरच ताकद मिळते.

यावरूनच समजेल आपल्याला कि आई किती क्षमा करते आपल्या प्रत्येकाला.....

या साठीच आपल्याला शत्रुघ्नेश्वरी पूजन करायचे आहे प्रसंनोत्सवाच्या वेळी...

त्या वेळी आपल्याला आपल्या आईला सांगायचे आहे कि..

"देवी (आई), तू आमच्या शत्रूंचा अशा रीतीने नाश कर कि त्यांच्यापासून आम्हाला त्रास होणार नाही आणि त्यांचे पण चांगले होईल."



बापू म्हणाले....

बाळानो "ती क्षमाशील आहे" हे म्हणायला चूक करू नका, विसरू नका.



बापूचे सगळे शब्द विसरलात तरी चालेल .



"पण आदिमाता म्हनजेच ULTIMATE क्षमा हे कधीच विसरू नका......."



म्हणूनच आईचे क्षमा हे नाव अंशी आहे आणि बाकी सर्व नवे अंश आहेत.......



हरी ओम!!!!



बाप्पा यात काही चुकले असेल तर श्री राम........

Friday, January 7, 2011

श्री मंगल चंडिका प्रपत्ती बदल प.प. बापू ह्या गुरुवारी बोलले. ह्या प्रपत्ती साठी कशी मांडणी करायची ह्याविषयी मनसामर्थ्यदाता साईट वरून तसेच सर्व उपासना केंद्रामधून माहिती उपलब्ध होणार आहे .
जेव्हा प्रत्येक पुरुष किवा स्त्री प्रपत्ती करते तेव्हा आपोआप त्यांची कुलस्वामिनी , वैखरी देवी पुजली जाते .आपल्या मेदुमध्ये जे जे आपण ज्ञान ग्रहण करतो त्या प्रत्येकाचे केंद्र वेगवेगळे असते .
उ.दा. ज्या आपल्याला भाषा येतात, त्या प्रत्येकाचे केंद्र वेगळे. यानुसार जेव्हा तुम्ही रामनाम लिहिता तेव्हा त्या रामनामाचे केंद्र आपल्या मेंदूत तयार होत असते .जेव्हा सतत नामस्मरण केले जाते तेव्हा ते अश्या प्रकारची अनेक केंद्रे उत्पन्न करते.
जेव्हा आंपण एख्याद्या वेळी झोपेत असतो आणि तेव्हाच जर काही अपघात घडला तर आपण त्यातून वाचतो ते ह्या नामस्मरणातून निर्माण झालेल्या केंद्रांमुळेच.
जेव्हा सतत नामस्मरण घडते ,किवा जेव्हा देवाच्या फोटोकडे बघतो , बोलतो ., तेव्हा हे केंद्र अधिकाधिक मोठे होत जाते. आणि सदगुरू तत्वाच्या नामाचे केंद्र महा प्रलयात सुद्धा नष्ट होत नाही .जेव्हा भक्ती वाढत जाते तेव्हा सगळ्या देवतांचे केंद्र (नाम स्मरणाचे ) हे तीन प्रमुख केंद्रात विलीन होतात .ही तीन केंद्रे म्हणजे ..
दत्तगुरू
|
चंडिका
|
सदगुरू ( परमात्मा )


ह्या तीन पातळ्यांनी बनलेले ( त्रिस्तरीय ) प्रत्येकाचे केंद्र येणाऱ्या प्रसंनोत्सवात मला strong बनवायचे आहे. म्हणूनच जास्तीत जास्त रामनाम वही लिहिणे ,स्तोत्रे म्हणणे आवश्यक आहे . ह्यातून निर्माण होणारे केंद्र माग नित्य जागृतच राहते .
हे त्रिस्तरीय केंद्र म्हणजेच श्री गुरु केंद्र .हे श्री गुरु केंद्र तुमच्या लिंग देहापेक्षा ही मोठे करणे हेच माझे ध्येय आहे .म्हणजेच ह्या श्री गुरु केंद्राची लांबी,रुंदी, व उंची ही तुमच्या लिंग देहापेक्षा जास्तीत जास्त उंच झाली पाहिजे .
प्रत्येकाच्या पापानुसार त्याचा लिंग देह ठरतो अश्या ह्या लिंग देहापेक्षाही जेव्हा श्री गुरु केंद्र मोठे होइल तेव्हा ते तुमच्या पुढच्या अनेक जन्मासाठी सुद्धा कार्यरत ठरणार आहे. म्हणजेच तुमचे प्रारब्ध तुमच्या आड कधीच येणार नाही.
माझ्या वर जो कोणी प्रेम करतो त्या प्रत्येकाचे हे " श्री गुरु केंद्र " 'याची देही याची डोळा " मला अनेक पटीने मोठे करायचे आहे.


----
 प.पू. सदगुरू श्री अनिरुद्ध बापू ... (०६-०१-२०११,श्री हरि गुरूग्राम)

Friday, December 24, 2010

वास्तूबाधा विषयी प.पू. बापूंनी २३ -१२ २०१० च्या प्रवचनात काही महत्वाचे points सागितले






वास्तूबाधा विषयी सागताना प.पू. बापूंनी २३ -१२ २०१० च्या प्रवचनात काही महत्वाचे points सागितले :


१) स्वतःच्या घरात कधीही दक्षिणेकडे पाय करून झोपू नये .


२) तुमच्या घरात कोणीही मनुष्य बाहेरून आत आला की प्रथम त्याला तुमच्या देवाचा /सद्गुरूंचा फोटो दिसलाच पाहिजे .(ह्यामुळे जर कोणी मनुष्य वाईट हेतू घेयून तुमच्या घरात प्रवेश करत असेल तर त्याचे विखार (वाईट विचार ) तुमचा देव स्वत:कडे घेतो .)
३) किचन मध्ये तुमच्या शेगडीच्या विरुद्ध (समोरच्या बाजूस तुमच्या देवाचा फोटो असलाच पाहिजे .
ह्यामुळे तुमच्या घरात जे अन्न शिजते ते तुमच्या देवाच्या नजरेखाली बनते.
४) तुमच्या बाथरूम मध्ये नळाच्या वरती कुंकू/हळद/अष्टगंध ह्याने रोज स्वस्तिक काढावा. तो paint करून घेयू नये . तर रोज हाताने काढणे आवश्यक आहे.
जर शौचालय व बाथरूम एकत्र असेल तर शौचालायापासून दूर नळाच्या वर स्वस्तिक काढावा .
५) रोजची अंघोळ म्हणजे स्वत: स्वत:ला अभिषेक करणे म्हणून रोजची आंघोळ करताना सद्गुरूंचे नामस्मरण करावे .(ॐ ग्लौम अनिरुद्धाय नम: )


**** तुमच्या राहत्या घरात जर वास्तू बाधा आहे असे जाणवत असेल तर पुढील तीन महत्वाच्या गोष्ठी प.पू.बापूंनी करण्यास सांगितल्या .


१) कुठल्याही एका मंगळवारी आदिमाता चंडीकेचा फोटो हृदयाशी डाव्या बाजूला धरून श्री गुरूक्षेत्रम मंत्र म्हणत दिवसाच्या आठ भागात प्रत्येक वेळी कमीत कमी ६ मिनिटे घरात फिरावे . ( दिवसाचे आठ भाग म्हणजे रात्री ११.३० ते दुसर्या दिवशी रात्री ११.३० पर्यंतचा काळ .ह्या काळाला ८ भागात विभागणे म्हणजे ३ तासाचा एक भाग होतो. ह्या एका भागात ६ मिनिटे असे ८ वेळा म्हणजे ४८ मिनिटे वर सांगितल्या प्रमाणे श्री गुरूक्षेत्रम मंत्र म्हणावा .( ** असा मंत्र म्हणताना त्या मंगळवारी घरात कोणाचा वाढदिवस नसावा व तो दिवस अमावास्येचा नसावा )


२) घराला जर भूत किवा अन्य कुठली बाधा जाणवत असेल तर कुठल्याही पौर्णिमेच्या दिवशी डाव्या हातात उदीचे भांडे घेवून उजव्या हाताने घराच्या उंबरठ्यापासून "श्री गुरू" (continue) मंत्र म्हणत उदी लावायला सुरुवात करावी .व सगळी कडे भिंती , कपाटे ,बाथरूम प्रत्येक ठिकाणी घरात उदी लावत जावे . उदी लावण्याचा काळ पौर्णिमा जेव्हा सुरु होते व जेव्हा संपते ह्या मधलाच असावा . ही गोष्ट वर्षातून एकदा केली तरी चालते .


३) तिसरी महत्वाची वास्तू बाधानाशक गोष्ट म्हणजे प्रपत्ती ..श्री रण चंडिका प्रपत्ती व श्री मंगल चंडिका प्रपत्ती .


" तुमची स्वत:ला जेवढी खात्री नसेल तेवढी मला तुमची खात्री आहे ..तुमचे दोष मी मोजत नाही तर तुमचे गुण मी मोजतो ". --- प.पू. सदगुरू श्री अनिरुद्ध बापू


----- ( श्री हरि गुरु ग्राम येथील प्रवचन ..२३-१२-२०१० )


च्या प्रवचनात काही महत्वाचे points सागितले

Monday, November 15, 2010

"श्री साईप्रदत्त अभ्युदयपर्व ".

श्री साईप्रदत्त अभ्युदयपर्व म्हणजे श्रद्धावानांसाठी प्रकटलेली साक्षात गंगा आहे.येणाऱ्या तिसऱ्या महायुद्धासारख्या भीषण काळामध्ये ही गंगा माझ्यासाठी आई बनून रक्षण करणारच. कारण या गंगेचे उगम आणि मुखही श्री अनिरुद्ध गुरूक्षेत्रम आहे,तर आदिमाता अनसूया गंगोत्री आहे.
१०० वर्षापूर्वी म्हणजे १९०८च्या पौष पौर्णिमेस म्हणजेच शाकंभरी पौर्णिमेस ह्या पर्वाची सुरुवात झाली,व १९१०च्या विजया दशमीस ह्या पर्वाची सांगता झाली होती. सदगुरू श्रीअनिरुद्धांच्या कृपाशिर्वादामुळे त्यांनी हा सुवर्णकाळ पुन्हा माझ्या जीवनात आणला आहे. ह्या श्रीसाई प्रदत्त अभ्युदय पर्वाची सांगता अनिरुद्ध पौर्णिमा २०१० रोजी म्हणजेच २१ नोव्हेंबर २०१० रोजी होणार आहे.
सदगुरू श्रीअनिरुद्धांनी आपला अक्षय पारमार्थिक खजिना श्रद्धावानांसाठी सताड उघडा टाकला आहे व तो लुटून नेण्याची विशेष संधी ह्या पर्वकाळात त्यांनी श्रद्धावानांना दिली आहे.
ह्या खजिन्याची प्राप्ती व्हावी म्हणून मला ह्या पर्व काळात तीन प्रमुख गोष्टी करायच्या आहेत त्या म्हणजे --१) सदगुरू दत्तात्रेयांचे स्मरण व खालील श्लोकाचे पठण - "अनसूयोत्रिसंभूतो दत्तात्रेयो दिगंबर:
स्मर्तुगामी स्वभक्तानाम उद्धार्ता भवसंकटात "
भावार्थ:अनसूया (असूयाविरहित),अत्रिंपासून संभवलेला, दिशा हेच वस्त्र असणारा,स्मरणासवेच प्रकट होणारा,भवसंकटातून आपल्या भक्तांचा उद्धार करणारा असा हा दत्तात्रेय आहे.

२) सदगुरू श्री अनिरुद्धांचे स्मरण व श्री अनिरुद्ध गायत्री मंत्राचे पठण -
" ॐ मन: प्राण: प्रज्ञा, ॐ ततगुरु दत्तस्य ,उष्णं स्निग्धम गुरो: तेजो धीमही रामे चित्तलया ओजः अनिरुद्ध राम: प्रचोदयात "
भावार्थ : मन प्राण प्रज्ञा ह्या तीन व्याहृति आहेत.त्या गुरूदत्तांच्या उष्ण, स्निग्ध,व गुरुतेजाचे आम्ही ध्यान करतो.आमच्या चित्ताचा लय श्रीराम चरणी होवो,त्यासाठी श्रीअनिरुद्धराम आमच्या ओजाला प्रबळ प्रेरणा देवो.

३) सदगुरू श्रीअनिरुद्धांच्या पणजी द्वारकामाई पाध्ये यांनी विरचित केलेले आद्यकाव्य म्हणजेच खालील अभंग व त्याचे पठण-"ज्याने धरिले हे पाय,आणि ठेविला विश्वास||त्यासी कधी ना अपाय,सदा सुखाचा सहवास|| हे पाय पुरातन फार,केवळ हाची हो आधार ||साई साई म्हणता धार,धीर गंगेची अपार ||हे पाय कैसे तुमचे, हे तर आमुच्या सत्तेचे||ह्यांना नाही सोडणार, तू मरे- मरे- तो मार||जय जय राम कृष्ण हरी,साई झालासी त्रिपुरारी ||तू येसी आमुच्या दारी,तू केवळ  अनिरुद्ध

Wednesday, October 27, 2010

सद्गुरु बापून्नी दिलेले ९ मापदंड

१) आह्निक दररोज दोन वेळा करणे.

२) आह्निक, रामरक्षा, सदगुरूगायत्री(अनिरुद्ध-गायत्री मंत्र), सदगुरुचलिसा(अनिरुद्धचलीसा), हनुमानचालीसा व दत्तबावनी तोंडपाठ असणे व पुस्तकात न बघता म्हणता येणे. चार महिन्यांतून कमीत कमी एक रामनाम वही पूर्ण करणे व रामनाम बँकेत जमा करणे.

३) बरोबरच्या व हाताखालच्या सहका-यांशी उन्मत्तपणे व उद्धटपणे न वागणे. सहका-यांची किंवा हाताखालील व्यक्तींची चूक झाल्यास त्यांना जरूर त्याबद्दल ताकीद द्यावी परंतु अपमान करू नये.

४) उपासनांच्या वेळेस त्या स्थळी असणा-या प्रत्येकाने 'आपण उपासनांच्या वर आहोत किंवा आपल्यास उपासनांची आवश्यकता नाही' असे वर्तन करू नये.

५) बोलण्यापेक्षा, बडबडीपेक्षा कोण भक्ती व सेवेच्या कार्यक्रमात किती जीव ओतून सहभागी होतो हे माझ्या दॄष्टीने महत्वाचे आहे.

६) ह्या विश्वामध्ये कुणीही मानव 'आपण एकमेव अद्वितीय आहोत व आपली जागा दुसरा कुणीही घेऊ शकत नाही किंवा आपल्यासारखे कार्य करु शकत नाही' , असे म्हणू शकत नाही व असे कुणीही मानू नये.


७) श्रद्धावानांच्या नऊ समान निष्ठा त्याला मान्य असल्याच पाहिजेत व त्याच्या आचरणातही असल्याच पाहिजेत.

८) चूक झाल्यास चूक सुधारण्याची तयारी पाहिजे.

९) परपीडा कधीच करता कामा नये।
माझ्या लाडक्या श्रद्धावान मित्रांनो, आपल्यासमोर श्रीरामचरिताचाच आदर्श असला पाहिजे व त्यामुळे 'पावित्र्य हेच प्रमाण' ह्याच मूलभूत सिद्धांतानुसार प्रत्येकाचे आचरण असले पाहिजे व वरील नऊ गोष्टी ज्याच्याकडे नाहीत, तो माझ्या जवळचाच काय, परंतु दुरान्वयाने संबंध असणाराही असू शकत नाही, हा माझा ठाम निश्चय आहे.

तुमच्या हातात मी आज 'मला काय आवडते व काय आवडत नाही' ह्याचा निश्चित मापदंड दिलेला आहे व हे मापदंड वापरूनच माझ्याशी निगडित असणारे प्रत्येक कार्य व यंत्रणा राबविले गेले पाहिजेत